Ad will apear here
Next
‘यूपीएससी’चा गुगल सर्च - आयएएस मंत्रा
‘यूपीएससी’ची एबीसीडी ते आयएएसपर्यंतच्या परिपूर्ण तयारीचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड म्हणून सिद्ध झालेले पुस्तक म्हणजे राष्ट्रचेतना प्रकाशनाचे ‘आयएएस मंत्रा.’ फारुक नाईकवाडे आणि रोहिणी शहा यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अल्प परिचय...
........
सहज-सोप्या, ओघवत्या भाषेत ‘यूपीएससी’सारख्या क्लिष्ट विषयावर महत्त्वाचे लेखन करून फारुक नाईकवाडे आणि रोहिणी शहा या लेखकांनी कौतुकास्पद कार्य केले आहे. यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासाचा परीघ, आवाका व्यापक आहे. म्हणूनच त्याचे स्वयंस्पष्ट आकलन ही अवघड बाब आहे. अभ्यासविषयाच्या व्यापकतेला आपल्या भूमिकेच्या टोकावर आणणे, क्लिष्टता कमी करून सोपेपणा आणणे, भीती कमी करून आत्मविश्वास जागवणे, यूपीएससी परीक्षेचे कोडे उलगडून ‘तुम्ही हे करू शकता’ हा आत्मविश्वास देणे या सर्वच बाबतीत ‘आयएएस मंत्रा’ हे पुस्तक अपेक्षापूर्ती करणारे ठरते.

‘आयएएस’ची तयारी करायची अशी प्रखर भावना मनाशी असते; पण नेमकी सुरुवात कोठून करायची या बाबतीत गोंधळ असतो. परीक्षेच्या बाबतीतील अवास्तव गैरसमज, भीती व न्यूनगंडातून परीक्षेविषयी संभ्रम वाढण्यापेक्षा दुसरे काहीच साध्य होत नाही. नागरी सेवा परीक्षेच्या सर्व टप्प्यांशी निगडित पुरेपूर माहिती व यशापर्यंत पोहोचायची रणनीती या एकाच पुस्तकात उपलब्ध झाली आहे. पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ, रचना, मांडणी, बांधणी या गोष्टी पुस्तकाचे संग्रहमूल्य नक्कीच वाढवतात.

प्राथमिक माहिती किंवा अभ्यासाच्या नोट्स या पलीकडे जाऊन भरीव माहिती देणाऱ्या पुस्तकांची तशी वानवाच आहे. स्पर्धात्मक परीक्षा क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेले, वेगळा ट्रेंड निर्माण करणारे पुस्तक म्हणून ‘स्टील फ्रेम’चा उल्लेख करावा लागेल. यानंतर प्रकाशित झालेली बहुतेक पुस्तके अनुकरण करणारी अशीच होती. ‘आयएएस मंत्रा’ हे त्यापुढचे पाऊल आहे. या पुस्तकाचा संपूर्ण अभ्यास म्हणजे ‘यूपीएससी’च्या पदवीचा अभ्यास इतके हे पुस्तक परिपूर्ण सिद्ध झाले आहे. ‘आयएएस मंत्रा’ हे पुस्तक महाराष्ट्रासाठी ‘यूपीएससी’चा गुगल सर्च ठरेल, यात शंका नाही.

(‘आयएएस मंत्रा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZXOCI
Similar Posts
स्पर्धा परीक्षांचा धर्मग्रंथ - ‘स्टील फ्रेम’ ‘स्टील फ्रेम’ हे फारुक नाईकवाडे यांनी लिहिलेले आणि राष्ट्रचेतना प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक आज स्पर्धा परीक्षांचा धर्मग्रंथ म्हणून सिद्ध झाले आहे. डॉ. श्रीकर परदेशी, विश्वास नांगरे-पाटील, अजित जोशी, अभिनय कुंभार आणि इतर ११ अधिकाऱ्यांच्या यशोगाथा, त्यांच्या संघर्षकथा हा या पुस्तकाचा विषय आहे. या
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे
करोनानंतरच्या काळात शिक्षण अधिक विद्यार्थिकेंद्री बनेल : डॉ. अभय जेरे पुणे : ‘करोना साथीच्या काळानंतर शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीचे मिश्रण येईल आणि ती अधिक विद्यार्थिकेंद्री होईल. प्रश्न सोडविणारे, रोजगार निर्माण करणारे, तंत्रकुशल विद्यार्थी देशाला हवे असून, त्याकडे लक्ष द्यावे लागेल,’ असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांनी केले
करोनाच्या पार्श्वभूमीवर नवोदितांना नोकऱ्यांसंदर्भात मार्गदर्शन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मोफत वेबिनार पुणे : करोनाच्या साथीमुळे उद्धवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. पदवी घेऊन करिअर सुरू करण्याच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. आपल्या प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना, नवी नोकरी कशी शोधायची, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language